आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गावठी दारू
गावठी दारू

नेवासा – मा.श्री. प्रमोद सु. सोनोने साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर-१, मा.श्री. ऋषिकेश इंगळे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर-२, मा.श्री.प्रविणकुमार तेली साहेब, उपअधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग, अहिल्यानगर व त्यांच्या स्टाफने खंडाळा-सोनेवाडी रोडवर, खंडाळा शिवार येथे अवैधरित्या विक्री उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून धडक कारवाई केली आहे.

गावठी दारू

या कारवाईत गणेश पोपट गिहे, वय ४४ वर्षे, रा.खंडाळा, ता. जि. अहिल्यानगर या आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग, अहिल्यानगर यांचे कार्यालयाकडे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यामध्ये एक मारुती सुझुकी कंपनीची अल्टो चारचाकी वाहन जिचा प्रादेशिक परिवहन क्र. MH १२ KT ५४८० मध्ये गावठी दारूचे ३५ लिटर मापाचे ०५ प्लास्टिक कॅन मिळून १७५ लिटर हातभट्टी गावठी दारू असा एकूण २,०३,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गावठी दारू

सदरची कारवाई श्री. नवनाथ मारकड, निरीक्षक, श्रीमती. सृष्टी भागवत, दुय्यम निरीक्षक, श्री.एस.बी.लगड, स.दु.नि., जवान सर्वश्री. नेहाल उके, प्रविण साळवे, दिनेश खैरे, विदया आव्हाड, यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती. सृष्टी भागवत, दुय्यम निरीक्षक, या करत आहेत.

गावठी दारू

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री. नवनाथ एन. मारकड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग, अहिल्यानगर यांनी दिली आहे.

गावठी दारू

तरी जनतेस आवाहन करण्यात येते कि, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व WHATS APP क्र. ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गावठी दारू
गावठी दारू
गावठी दारू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गावठी दारू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!