आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
किसान

नेवासा-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तारकेश्वर (जि. हुगळी. पश्चिम बंगाल) येथे झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने इथून करण्यात आले.

किसान

दिनांक २० जून २०२६ रोजी देशातील ९.४४ कोटीपेक्षा अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना१८८८० कोटीपेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण यावेळी करण्यात आले. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेवासा व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. प्रमुख कार्यक्रम सुरू होण्या अगोदर उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामातील व विविध फळपिकांची लागवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, किडी व रोगांचे व्यवस्थापन याबद्दल श्री नंदकिशोर दहातोंडे व श्री माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले.

किसान

हवामान बदल व एल निनो यामुळे होणारे बदल, आपत्कालीन पीक व्यवस्थापन, कमी पाणी असताना व पिकास ताण बसल्यानंतर करावयाचे व्यवस्थापन, विविध पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ एस.एस.कौशिक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी नेवासा यांनी केले. कार्यक्रमास श्री अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी, शेवगाव, वैशाली नागवडे, मंडळ कृषी अधिकारी,

किसान

ढोरजळगाव, श्री सुडके, मंडळ कृषी अधिकारी, सलबतपुर कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, आत्मा चे अधिकारी हजर होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. चंद्रशेखर गवळी, श्री प्रकाश हिंगे, श्री प्रकाश बहिरट, श्री प्रवीण देशमुख, श्री अनिल धनवटे व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ श्री सचिन बडधे यांनी तर आभार इंजी. राहुल पाटील यांनी मानले.

किसान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किसान
किसान
किसान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!