आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शंकरराव गडाख

विरोधी उमेदवारांचा 6 हजार मतांच्या फरकाने दारुण पराभव

शंकरराव गडाख

सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत एकहाती सत्ता कायम राखली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २१ पैकी १७ जागा बिनविरोध जिंकणाऱ्या गडाख पॅनलने उर्वरित चार जागांवरही सुमारे सहा हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला.

शंकरराव गडाख

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्व जागांवर लढत देण्याचा दावा करणाऱ्या विरोधी पॅनलला प्रत्यक्षात सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यामुळे केवळ चार जागांवरच निवडणूक लढवावी लागली. या चारही जागांवर मतदारांनी गडाख पॅनलवर एकतर्फी विश्वास दाखवत विरोधकांना स्पष्ट नाकारले.

शंकरराव गडाख

करजगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमक (६,८९५) आणि ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६,७२५) यांनी दणदणीत विजय मिळविला. विरोधी उमेदवार नारायण डौले (८४७) व किरण जाधव (१,०४१) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
महिला राखीव मतदारसंघातून कमल चांगदेव दहिफळे (७,४०१) आणि विमल नारायण सोनवणे (७,१८२) विजयी झाल्या, तर विरोधी उमेदवार मीराबाई दिवटे यांना केवळ १,००० मते मिळाली.

शंकरराव गडाख

विरोधी उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली
यापूर्वीच सोनई, घोडेगाव, खरवंडी, नेवासा, प्रवरासंगम तसेच विविध प्रवर्गांतील एकूण १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच गडाख पॅनलने विजयाची मजबूत पायाभरणी केली होती.
या निकालानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा एकमुखी विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शंकरराव गडाख

सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी हा विजय मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा कौल असल्याचे सांगितले. तसेच विरोधी पॅनलकडून धनशक्तीच्या बळावर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत मतदारांनी मतदानातून त्याला चोख उत्तर दिल्याचा दावा विजयी उमेदवारांनी केला. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत विरोधी पॅनलच्या मतांमध्ये यंदा लक्षणीय घट झाल्याचेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. या निकालामुळे मुळा सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलची एकहाती सत्ता कायम राहिली आहे.

शंकरराव गडाख

विरोधी मतांमध्ये लक्षणीय घट

गेल्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या कारखाना निवडणुकीत
गडाख विरोधी पॅनलला पडलेल्या मतांच्या तुलनेत
सध्याच्या विरोधी पॅनलच्या उमेदवारास पडलेल्या
मतांमध्ये लक्षणीय घट झाली. खासगी कारखादार असलेल्या विरोधी पॅनल प्रमुखाला या निवडणुकीत
सभासद मतदारांनी पूर्णपणे नाकारले..

शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!