आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
इंडियन आर्मी

नेवासा- तालुक्यातील भानसहिवरे येथील अत्यंत गरीब मजुराचा मुलगा संकेत शिंदे याची इंडियन आर्मी मध्ये उच्च पदावर निवड झाली आहे. याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी त्याचा उत्साह पूर्ण वातावरणात सत्कार केला. त्याची वडील राजेंद्र व आई सुरेखा अत्यंत गरीब परिस्थितीत मजुरी करतात.

इंडियन आर्मी

हायस्कूलमध्ये शिकत असताना संकेतने आई-वडिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने केटरिंग चे काम निष्ठेने केले तदनंतर दहावी उत्तीर्ण नंतर आयटीआय मोटर मेकॅनिकल हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीचा शोध घेत असताना नेवासा फाटा येथील समर्पण करिअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले तदनंतर त्याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली असून हरियाणा येथे हजर होण्यासाठी आदेश प्राप्त झाले आहे त्याच्या सत्कार समारंभाला म्हणून देविदास साळुंखे,

इंडियन आर्मी

संत ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक प्रसाद पठारे, दत्तू भाऊ काळे, उपसरपंच अविनाश महाराज, महानुभाव पंथ भानसहिवरा, माऊली शिरसागर, आजी लताबाई, मामा दहीतुले बंडू उगले, दत्ता उगले ,लखन शिंदे व प्रगतशील शेतकरी विश्वनाथ चव्हाण, खेडले काजळी माजी सरपंच सौ निर्मला ताई ढगे पाटील व ग्रामस्थ भानसहिवरे येथील उपस्थित होते.

इंडियन आर्मी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

इंडियन आर्मी
इंडियन आर्मी
इंडियन आर्मी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

इंडियन आर्मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!