आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वाकचौरे

नेवासा :गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेला कौठा ते महालक्ष्मी हिवरा रस्त्याच्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हिरवा कंदिल कामाला दाखवला आहे. सदर रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तरतूद करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच प्रमोद गजभार यांनी पुण्यनगरीशी बोलताना दिली आहे.

वाकचौरे

नेवासा तालुक्यातील कौठा ते महालक्ष्मी हिवरा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत घेण्यासाठी मागणी केली जात होती. परंतु हा रस्ता होत नसल्याने दोन्ही गावांतील नागरिकांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होत होते. ३-४ किलोमीटर चिखलातून पायपीट करावी लागत असे तसेच शालेय विद्यार्थी व शेतकरी यांना दररोज ये-जा करण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत होते.

वाकचौरे

या रस्त्याचा गावातील ८०-९० टक्के शेतकरी आपल्या शेतात व वाडी वस्तीवर जाण्यासाठी उपयोग करत आहेत. हा रस्ता कौठा ते हिवरा श्री खंडोबा पालखी मार्ग असल्याने या रस्त्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी थेट शिर्डीत खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत ठराव देऊन रस्त्याच्या कामासंदर्भात वाकचौरे कडून सहमती घेतली असल्याचे सरपंच गजभार यांनी सांगितले. तसेच याकामी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे याचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचेही ते म्हणाले.

वाकचौरे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाकचौरे
वाकचौरे
वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाकचौरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!