
नेवासा- तालुक्यातील प्रवरा संगम गावातील 90 शेतकऱ्यांना कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत बियाणे वाटप करण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती कीर्ती सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना कपास कांती अंतर्गत बियाणे वाटप करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी शास्त्रज्ञ अशोकराव ढगे होते. मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी उच्च घनता लागवड कपाशीची करून उत्पादन वाढवावे यासंदर्भात माहिती दिली दोन ओळीतील अंतर तीन फूट व दोन रोपातील अंतर एक फूट तसेच अर्धा फूट ठेवून लागवड करावी.

त्याचप्रमाणे कपाशीची फांद्यांची वाढ म्हणजे कायिक कमी करण्यासाठी चमत्कार ची फवारणी करावी असा सल्ला दिला महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी यावर्षीच्या हंगामात प्रयत्न केले जाणार आहे. या समारंभाला प्रकाश पांडव नामदेव मते उल्हास मुळे, रवींद्र फाजगे, शिवाजी पारखे, शिवाजी आगळे, गंगाधर वाघमारे व अनेक शेतकरी उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







