नेवासा-महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाच्या नेवासा सर्वांगीण विकासाचा आवाज घुमला आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांची सुरक्षितता, धार्मिक पर्यटन आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून सभागृहात शासनाचे लक्ष वेधत कोट्यवधींच्या निधीची आग्रही मागणी केली.
आमदार लंघे यांनी सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि कौशल्य विकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत प्रभावीपणे बाजू मांडली.

१९६६ मध्ये प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला जुना पूल असून, सध्या अत्यंत जीर्ण झाला असून, वाढत्या वाहतुकीमुळे येथे नवीन पुलाची गरज आहे. दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या पुलासाठी सुमारे ₹१०० कोटींची तरतूद करून काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
श्रीक्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पुलाचे काम जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे रखडले आहे. यासाठी ₹३ कोटींचा अतिरिक्त निधी देऊन काम मार्गी लावावे, जेणेकरून १३ गावांतील नागरिक व भाविकांची सोय होईल, असे लंघे नाशिक म्हणाले.

तसेच, २०२७ मधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नेवासा, देवगड,
आणि शनी शिंगणापूर परिसरातील रस्त्यांचे उन्नतीकरण, जुन्या पुलांचे पुनर्बाधकाम व विश्रामगृहांची उभारणी करण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मुकिंदपूर येथील शासकीय ‘आयटीआय’च्या विस्तारासाठी नवीन कार्यशाळा व आधुनिक सुविधा, तर नेवासा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी, भूमिगत गटार योजना आणि आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्य योजनेत नेवासाचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार लंघे यांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे नेवासा मतदारसंघातील मोठी गती विकासकामांना मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







