माका प्रतिनिधी ( आदिनाथ म्हस्के ) :- कृषी दिनानिमित्त मौजे वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर श्री. सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना सघन कापूस लागवड पद्धती, संत्रा बाग व्यवस्थापन तसेच फळबाग विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी केंद्र पुरस्कृत उत्पादकता अभियान (कापूस कांती) २०२६-२७ अंतर्गत सघन कापूस लागवड पद्धतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सघन लागवडीचे महत्त्व, योग्य लागवड अंतर, उत्पादनवाढ, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर, तण नियंत्रण तसेच उत्पादन खर्चात बचत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले तसेच सघन लागवडीमुळे अधिक उत्पादन कसे मिळू शकते, याची माहिती देण्यात आली.

यानंतर संत्रा बागेची पाहणी करून आंबे बहार व्यवस्थापन, संत्रा पिकातील आवश्यक उपाययोजना तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ‘एल निनो’ परिस्थितीचा फळबागांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्यावरील व्यवस्थापन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच फळबाग विमा योजनेचे महत्त्व, विमा संरक्षणाचे लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग विम्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी श्री. बबनराव कराड, सहायक कृषी अधिकारी श्री. गणेश भराट, सहायक कृषी अधिकारी श्री. रुपेश पवार तसेच सिद्धेश्वर शेतकरी गटाचे सदस्य आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







