नेवासा – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानची पायी दिंडी ८ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरासमोरील मुख्य मार्गावरील धोकादायक खोल खड्ड्याबाबत ‘आम्ही नेवासकर न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध करून हा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या वृत्ताची दखल घेत नेवासा नगरपंचायतीने संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मंदिरासमोरील मुख्य मार्गावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून खोल खड्डा पडून होता. माळी वस्तीकडे जाणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही हा खड्डा न बुजविल्यामुळे वारकरी, भाविक, नागरिक तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. आगामी पायी दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक या मार्गाने ये-जा करणार असल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत होती.
या संदर्भात ‘आम्ही नेवासकर न्यूज’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नेवासा नगरपंचायतीने तातडीने दखल घेत मंदिरासमोरील रस्त्याच्या दुरुस्त केला आहे.

स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीच्या या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत करत ‘आम्ही नेवासकर न्यूज’ने लोकहिताचा प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने केलेली तातडीची कार्यवाही ही निश्चितच दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







