आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
निवडणूक

नेवासा (प्रतिनिधी): विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या गणना प्रपत्र (EF फॉर्म) भरण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी आज नेवासा तहसील कार्यालयाला अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली.

निवडणूक

यावेळी त्यांनी स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उपस्थित तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि प्रभारी शिक्षण अधिकारी यांना EF फॉर्म वितरण व डिजिटायझेशनच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

नेवासा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ २ टक्के मतदारांपर्यंतच EF फॉर्मचे वितरण झाल्याचे निदर्शनास आले. यावर नाराजी व्यक्त करत श्री. गाढे यांनी दररोज किमान ८ ते ९ टक्के मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण करावे तसेच तेवढ्याच प्रमाणात फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

निवडणूक

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निवडणूक
निवडणूक
निवडणूक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निवडणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!