
नेवासा – शहरातील विशेष मोहीम म्हणून ब्लॅक फिल्मप्रकरणी चारचाकी वाहनांवर
व फॅन्सी नंबर प्लेट ,ट्रिपल सीट अशा वाहनधारकांवर 57 केसेस करून 62 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.सदर कारवाईत आजपर्यंत वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या गाड्यांचे ब्लॅक फिल्म काढून टाकण्यात आली आहे.

नेवासा शहराचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या धडक कारवाई मुळे ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर दिसने बंद झाले आहे. तसेच वाहतूक पोलिसांचा रोडवरील वावर वाढल्याने ज्यांचेकडे वाहन चालविण्याचे लायसन नाही, अल्पवयीन वाहन चालक, दुचाकीवर ट्रीपलशीट जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण आले आहे.


यावेळी प्राथमिक शाळेतील मुलेही ही कारवाई पाहत होते यावेळी पोलिस निरीक्षक दराडे यांनी मजेत त्यांना तुमच्या सायकलीची नंबर कुठे आहे असे विचारले असता त्यांनी सायकलला नंबर प्लेट नसते असे सांगितले त्यांनतर पो.नि. दराडे यांनी वाहतुकीच्या नियमांची त्यांना माहिती दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







