आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नगराध्यक्ष
नगराध्यक्ष

नेवासा – नेवासा शहरातील ‘आपले दवाखाना’ येथे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी १ जुलै २०२६ रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. १५ दिवसांच्या आत योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नगराध्यक्ष

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ६ मे २०२६ रोजी स्थानिक वृत्तपत्रांमधूनही या समस्यांबाबत वृत्त प्रकाशित झाले. मात्र, इतका कालावधी उलटूनही नगरपंचायतीकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नगराध्यक्ष

निवेदनात ‘आपले दवाखाना’ हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व गरजू नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र असून, तेथे आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपंचायतीची जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष

नेवासा शहरातील नागरिकांनी नगराध्यक्षांना विकासकामे करण्यासाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र आज नगराध्यक्ष जनतेच्या अपेक्षेनुसार काम करताना दिसत नाहीत. ‘आपले दवाखाना’सारख्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात आजही पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा नसणे हे दुर्दैवी आहे. नगरपंचायतीने तातडीने या प्रश्नांची दखल घ्यावी, अन्यथा जनहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. – अंजुम पटेल शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी

नगराध्यक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगराध्यक्ष
नगराध्यक्ष
नगराध्यक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!