
नेवासा – दिवंगत जनसेवक श्री. राजेंद्र मापारी व नगरसेविका सौ. सीमाताई मापारी यांच्या स्मरणार्थ नेवासा शहरातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम नगरसेवक तथा सभापती स्वप्निल राजेंद्र मापारी आणि ॲड. अनिकेत राजेंद्र मापारी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संभाजी धोत्रे, दिनेश व्यवहारे, मुक्तारभाई शेख, आसिफभाई पठाण, डॉ. राहुल चव्हाण, युवा उद्योजक राहुल शेठ मुंडलिक, अभय शेठ मुथथा, अजिंक्य जगताप, मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी, मुख्याध्यापिका श्रीमती पारखे, पर्यवेक्षक चौधरी सर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत जनसेवक राजेंद्र मापारी व नगरसेविका सीमाताई मापारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमारजी पाटील म्हणाले, आई-वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा स्वप्निल मापारी व ॲड. अनिकेत मापारी यांनी समर्थपणे पुढे चालविला असून, गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि समाजासाठी आदर्श आहे.

मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी यांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मापारी बंधूंचे आभार मानले. याच कार्यक्रमात युवा उद्योजक राहुल शेठ मुंडलिक यांनी विद्यालयासाठी ₹२१ हजारांची देणगी जाहीर करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आखाडे सर यांनी केले.

यावेळी नगरसेवक तथा सभापती स्वप्निल राजेंद्र मापारी यांनी, “गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आम्ही कायम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास घडविणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







