आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
ज्ञानेश्वरी घाट

नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह. भ. प. वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांनी गेल्या वर्षी आषाढीच्यादरम्यान अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ असं नाव देण्यात यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने ती अपेक्षा आज (दि. ११) पूर्ण झाली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने या घाटात पैस खांबाची प्रतिकृती आणि ‘ज्ञानेश्वरी घाट’ अशीच ठळक अक्षर असणारा फलक याठिकाणी लावण्यात आला.

ज्ञानेश्वरी घाट

ह भ प वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज, ह भ प उद्धव मंडलिक महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग, मंदिर संस्थांचे विश्वस्त कैलासराव जाधव, यांच्यासह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत या फलकाचं अनावरण करण्यात आलं. माजी मंत्री शंकरराव गडाख, राम महाराज झिंजुर्के, प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, मुळा कारखान्याचे संचालक आदींसह यशवंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्थानिक सरपंच यावेळी उपस्थित.

… पण आपल्या सर्वांची जबाबदारी प्रचंड वाढलीय…!

युवा नेते उदयन गडाख यांचं होतं विशेष लक्ष…!

ज्ञानेश्वरी घाट

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ असं नाव देण्याचं आणि या फलकाच्या अनावरण सोहळ्याचं संपूर्ण नियोजन युवा नेते उदयन गडाख यांच्याकडे होतं. यामध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून पैस खांबाची प्रतिकृती आणि ‘ज्ञानेश्वरी घाट’ ही अक्षर असलेला एलईडी फलक स्वतः तयार करुन घेतला. या फलकाच्या अनावरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उदयन गडाख यांच्यासह यशवंत प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ज्ञानेश्वरी घाट
ज्ञानेश्वरी घाट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वरी घाट
ज्ञानेश्वरी घाट
ज्ञानेश्वरी घाट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वरी घाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!