आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

नेवासा: नेवासा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शाहपूर (भाग क्र. २३१) येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तथा कृषी सहाय्यक अमोल अशोक साळवे यांच्याविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा

तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय बिरादार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २२१-नेवासा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. या मोहिमेत गणना प्रपत्रांचे वाटप,संकलन आणि संगणकीकरणाची जबाबदारी अमोल साळवे यांच्याकडे होती. मात्र, त्यांनी कामात कोणतीही अपेक्षित प्रगती न दाखविता कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

गुन्हा

कामाचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन स्वीकारला नाही किंवा कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तहसीलदार बिरादार यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित निवडणूक कायद्यातील तरतुदींनुसार नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील विभागीय आणि कायदेशीर कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!