आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वारी
वारी


नेवासे – नेवासे तालुक्यातील वडाळा येथील वृत्तपत्र विक्रेते तथा संत सेना महाराज दिंडीतील वारकरी लक्ष्मण विठ्ठल मोटे (वय ४६) यांचे पंढरपूरकडे पायी वारी करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे दिंडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मण मोटे हे संत सेना महाराज पायी दिंडीसोबत पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजता चालण्यास सुरुवात केल्यानंतर काही अंतरावर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

वारी

सहकारी वारकऱ्यांनी तातडीने त्यांना करमाळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
मोटे हे व्यवसायाने वृत्तपत्र विक्रेते असून पायी वारीत सहभागी होण्याचे त्यांचे हे सलग चौथे वर्ष होते. त्यांच्या अकाली निधनाने वृत्तपत्र विक्रेते, वारकरी संप्रदाय आणि वडाळा परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वारी

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वारी
वारी
वारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!