
नेवासा – संभाजीनगर, पुणे महामार्गावरील पांढरीपुल येथील इमामपुर घाटास ज्ञानेश्वरी घाट अशा नामकरणास शासन स्तरावर मान्यता मिळवुन देण्यात यावी या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना विश्व हिंदु परिषदेच्या वतीने देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडी सोहळा गंगापुर येथील विठ्ठल आश्रमातील रामभाऊजी महाराज राऊत ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के, श्रीराम महाराज झिंजुर्के, यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा ते पंढरपुर मागील वर्षापासुन भव्य दिव्य स्वरूपात निघत असुन मागील वर्षी दिंडी सोहळयात सहभागी महाराज व वारकरी मंडळीनी इमामपुर घाटातुन जात असताना शासनाकडे या घाटाचे नाव ज्ञानेश्वरी घाट असे देण्यात यावे. अशी भावना व्यक्त केली होती.

तसेच शासन पातळीवर या दिंडी सोहळयाचा मानाच्या दिंडयामध्ये सहभाग नोंदवुन शासनाने सुविधा पुरवाव्या अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यास अनुसरून शासनाने दिंडी सोहळयास यावर्षीपासुन मानाच्या पालखी सोहळयात समाविष्ट केले आहे. या निर्णयाचे वारकऱ्यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे.

मात्र पांढरीपुल येथील इमामपुर घाटाचे नाव ज्ञानेश्वरी घाट करण्यात आले नाही. यावर्षी घाटातुन पालखी सोहळा मार्गक्रमण करत असताना महाराज मंडळी व वारकऱ्यांनी प्राथमिक स्वरूपात ज्ञानेश्वरी घाट नामफलकाचे टाळ मृदुंगाच्या गजरात घाटाच्या पायथ्याशी अनावरण केले आहे. तरी इमामपुर घाटास ज्ञानेश्वरी घाट असे शासन स्तरावर मान्यता मिळवुन देण्यात यावी. हि विनंती. निवेदन देते वेळी आमदार विठ्ठलराव लंघे, विश्व हिंदु परीषदेचे जिल्हा संत संपर्क प्रमुख प्रशांत बहिरट यांच्यासह विश्व हिंदु परीषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







