नेवासा-आज नेवासा शहरातून दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी तसेच विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्या विविध मागण्याबाबत गुरु शिष्य आक्रोश मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, व सरकार विरोधी च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

नीट पेपर लीक प्रकरणाची सखल चौकशी करावी तसेच पेपर लीक प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, टीईटी पेपर लीक प्रकरणाची चौकशी करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, महाराष्ट्र पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, सर्व शासकीय भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेऊन भविष्यात पेपर फुटणार नाही यासाठी कठोर कायदे करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक नेवासा यांना देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असेही आंदोलनकर्त्यांनी यावेळेस सांगितले.

यावेळी आंदोलनासाठी विद्यार्थी संघटनेचे आकाश धनवटे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रंजन दादा जाधव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शुभम बंब, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, सुनाई तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष गणेश गडाख, नेवासा व्यापारी संघटनेचे कुणाल भांडण, भारत भाऊ कोकणे, गणेश सोनवणे, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, मी वडार संघटनेचे संदीप कुसळकर, एडवोकेट जैद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पोद्दार, राहुल भाऊ सूर्यवंशी, इरफान भाई शेख,

अरुण भाऊ जाधव, मोहन मामा भवाळ तसेच विविध विद्यार्थी संघटनांचे अनिकेत अंबाडे, अतिश धनवटे, सोमेश्वर नवगिरे, कैलास मस्के ,सचिन जाधव, इंजिनीयर अमोल मिसाळ, समाधान जाधव, सिद्धांत कांबळे, अमन सय्यद, ऋषिकेश जंगम, मच्छिंद्र जाधव, अश्फाक शेख, सुयश बेलेकर, इमरान शेख, निखिल विरकर, अजिंक्य आठरे, दीपक वाघ याचबरोबर समवेत शेकडो विद्यार्थी शिक्षक व नागरिक उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







