नेवासा-मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि / संदिप दरवडे पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झ गांबरे, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक तयार करुन अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.

दिनांक २०/०७/२०२६ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुंगी गावातील नदीतुन शासनाच्या मालकीच्या वाळुची चोरी करुन तिचा भोण्याई देवीच्या मंदिरा समोर सिमेंटच्या रसत्यावर साठा केला असुन काही इसम ते ट्रॅक्टरच्या लोडरच्या सहाय्याने ढंपरमध्ये भरुन तिची वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम लाल रंगाच्या ट्रॅक्टरच्या लोडरच्या सहाय्याने पांढ-या रंगाच्या दोन ढंपरमध्ये भरत असल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांचेवर छापा टाकुन तीन इसम ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे १) बाळासाहेब शिवाजी वाल्हेकर वय- ३२ वर्षे रा.मुंगी ता. शेवगाव, २) सोमनाथ अशोक आदमाने वय- ३५ वर्षे रा. मुंगी ता. शेवगाव, ३) संदिप राजेंद्र सोलाट वय-१९ वर्षे रा. मुंगी ता. शेवगाव असे असल्याचे सांगितले.

इसम नामे बाळासाहेब वाल्हेकर यास त्याचे कब्जात मिळुन आलेल्या ढंपरचे मालकी बाबत विचारपुस करता त्याने सदरचे ढंपर हे ४) त्र्यंबक भानुदास रक्टे रा.मुंगी ता. शेवगाव (फरार), असे असल्याचे सांगितले. इसम नामे सोमनाथ आदमाने यास त्याचे कब्जात मिळुन आलेल्या ढंपरचे मालकी बाबत विचारपुस करता त्याने सदरचे ढंपर हे ५) विजय आसाराम हुगे रा.मुंगी ता. शेवगाव (फरार), यांचे असल्याचे सांगितले. इसम नामे संदिप सोलाट यास त्याचे कब्जात मिळुन आलेल्या ट्रॅक्टर लोडरचे मालकी बाबत विचारपुस करता त्याने सदरचे ट्रॅक्टर लोडर हे विजय आसाराम हुगे रा.मुंगी ता. शेवगाव (फरार), यांचे असल्याचे सांगितले.
आरोपीचे कब्जातुन ८०,०००/- रु किमंतीची ४ ब्रास वाळु, २८,००,०००/-रु किमतीची ०२ ढंपर, ६,००,०००/-रु कि.ची एक ट्रॅक्टर लोडर, असा एकुण ३४,८०,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील आरोपीविरुध्द पोकॉ/ १७६ बाळासाहेब अशोक गुंजाळ नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाणे गु.र.नं.५९०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शेवगाव पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







