आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पुस्तक परिचय
पुस्तक परिचय

नेवासा – वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, सादरीकरण व अभ्यासपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सृजन कट्टा, नेवासा यांच्या वतीने तालुकास्तरीय ‘पुस्तक परिचय (अंतरंग पुस्तकाचे)’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हॉटेल कृष्णा, नेवासा येथे पार पडणार आहे.

पुस्तक परिचय

स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून, इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गट आणि इयत्ता अकरावी व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन गट असा विभाग करण्यात आला आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी रिस्ट वॉच, द्वितीय क्रमांकासाठी सॅक, तृतीय क्रमांकासाठी पार्कर पेन सेट, तर उत्तेजनार्थ रायटिंग पॅड देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

पुस्तक परिचय

स्पर्धेचे मूल्यमापन सभा धैर्य, भाषा कौशल्य व सादरीकरण, पुस्तकाशी संलग्नता, मुद्देसूद मांडणी आणि सादरीकरणातून निर्माण होणारा प्रभाव या पाच निकषांवर करण्यात येणार असून प्रत्येक निकषासाठी १० गुण असे एकूण ५० गुण निर्धारित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी १० मिनिटे तसेच २ मिनिटांचा अतिरिक्त कालावधी, म्हणजेच कमाल १२ मिनिटे दिली जाणार आहे. स्पर्धेसाठी डॉ. किशोर धनवटे, राजेंद्र चौधरी, निलेश जोशी आणि डॉ. निर्मलाताई सांगळे हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

पुस्तक परिचय

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी डॉ. किशोर धनवटे (९८५०८६३५०९), श्री. महेश मापारी (९९६०६१३९६१), श्री. सुधीर बोरकर (९८२२८२२२६८) किंवा प्रा. देविदास साळुंखे (७०४०५२७०४०) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन नोंदणी लिंकद्वारेही नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

पुस्तक परिचय

सृजन कट्ट्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढण्यास, विचार मांडण्याची कला विकसित होण्यास आणि दर्जेदार साहित्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुस्तक परिचय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुस्तक परिचय
पुस्तक परिचय
पुस्तक परिचय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुस्तक परिचय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!