वडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी हिरवीगार, पवार बंधूंचा स्तुत्य उपक्रम

नेवासा | अविनाश जाधव – स्व. निवृत्ती ज्ञानेश्वर पवार (आप्पा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुणतगाव येथील स्मशानभूमी परिसरात १५६ वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

कै. आप्पा यांचे सुपुत्र नितीन पवार व निलेश पवार यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम हाती घेतला. त्यांना मार्गदर्शक म्हणून आजोबा व महाराष्ट्र राज्य कृषिभूषण पुरस्कार विजेते माऊली पवार, माजी सरपंच साहेबराव पवार, अमेरिकेत स्थायिक सिताराम पवार व उद्योजक सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या वेळी आंबा, जांभूळ, कडुनिंब, चिंच अशा देशी व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो” या भावनेतून पवार कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध करून दिली.

या उपक्रमास पुणतगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वाकचौरे, ग्रामविकास अधिकारी सतीश मोटे, ग्रामपंचायत कर्मचारी बापूसाहेब लांडगे, वसीम शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वृक्षारोपण करणाऱ्या पवार कुटुंबीयांचा सत्कार केला.

परिसरातून या अनोख्या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. या वेळी धनराज माकोणे, अमोल जाधव, सागर पवार, योगेश शिंदे, अजिंक्य पवार, आदित्य पवार, सुजय पवार, पत्रकार अविनाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







