
माका | आदिनाथ म्हस्के :- नेवासा तालुक्यातील युवा उद्योजक व प्रगतशील शेतकरी आबासाहेब किसनराव भानगुडे पाटील वय वर्ष 45 यांचा 25 तारखेला शनिवार दुपारी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये मका पिकाला पाणी देत असताना विषारी सर्पाने दंश केल्यामुळे अहिल्या नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला .

माका गावचे माजी पोलीस पाटील किसन पाटील भानगुडे यांचे ते एकुलते एक चिरंजीव होते त्यांच्या निधनाने माका गावामध्ये व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे ते नेहमी सामाजिक कार्य ,धार्मिक ,व शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असत , त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले एक मुलगी बहिणी असा मोठा परिवार आहे त्यांच्या या दुःखद निधनाने माका गावांमधील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्णतेने रविवारी दिवसभर गाव पूर्णपणे बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







