आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दारू

नेवासा-मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नमुद आदेशान्वये श्री. संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, विजय पवार, अरूण गांगुर्डे, अशोक लिपणे, भगवान सानप व भगवान धुळे अशांचे पथक तयार करून सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.

दारू

दिनांक ०३/०८/२०२६ रोजी पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, चांदा गावचे शिवारात इसम नामे संदिप शिवाजी गायकवाड व राजु जावळे दोन्ही रा. चांदा हे त्यांचे साथीदारासह संदिप गायकवाड याच्या घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये दारूचे रसायन तयार करून बनावट दारू तयार करून ती वेगवेगळया कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून नवीन सील करून, बनावट दारू ही विदेशी मुळ कंपनीची असल्याचे भासवून हॉटेलला विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम चारचाकी वाहनामध्ये दारूचे बॉक्स टाकताना दिसला व एक इसम पत्र्याच्या शेडमध्ये दारू तयार करताना दिसला. पथकाने छापा कारवाई करताना पत्र्याच्या शेडमध्ये दारू तयार करता इसम पळून गेला.

दारू

पथकाने घटनाठिकाणाहुन युंडाई कंपनीचा वाहनामध्ये दारू टाकणाऱ्या १) विधीसंघर्षित बालक, वय १७, रा.चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. ताब्यातील विधिसंघर्षित बालकाकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता पळून गेलेले त्याचे वडील असून त्यांचे नाव २) संदिप शिवाजी गायकवाड, रा.चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे वडील ३) राजु जावळे (पुर्ण नाव माहित नाही), रा. चांदा (फरार) व ४) एक अज्ञात इसम यांचेसह बनावट दारू तयार करून विकतात. तसेच त्यांचेकडे दारू तयार करण्याचा व विक्री करण्याचा परवाना आहे काय याबाबत विचारपूस केली असता त्याने परवाना नसल्याची माहिती सांगीतली.

दारू

पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणाहुन ४,१६,९३५/- रू किंमत त्यात बनावट विदेशी दारूच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या ६४८ बाटल्या, ओल्ड मंक कंपनीच्या ९२० बाटल्या, ओल्ड मंक कंपनीच्या १२ (६५० मिली) बाटल्या, बी सेवन स्टर्लिंग कंपनीच्या १६० बाटल्या, इंम्पेरियल ब्लू कंपनीच्या १०५० बाटल्या, इंम्पेरियल ब्लू कंपनीच्या ७० (७५० मिली) बाटल्या, रॉयल चॅलेंज कंपनीच्या २७० बाटल्या, मॅजीक मोमेंट जामुन कंपनीच्या १८० बाटल्या, मॅजीक मोमेंट व्होडका कंपनीच्या ९६ बाटल्या, ग्रैंड मास्टर मँगो कंपनीच्या ६० बाटल्या, ग्रँड मास्टर मेलन कंपनीच्या ८० बाटल्या, मॅकडॉल व्हिस्की कंपनीच्या ४७० बाटल्या, मॅकडॉल रम कंपनीच्या ९० बाटल्या, किंग फिशर कंपनीच्या बीयर ६५ बाटल्या, आयकॉनीक व्हाईट कंपनीच्या ११० बाटल्या, ब्लेंडर प्राईड कंपनीच्या २५ बाटल्या, ब्लू ओसी कंपनीच्या ६५ बाटल्या, ७,५०,०००/- रू किं. ह्युडाई कंपनीची ओरा कार क्रमांक एमएच-४८-सीसी-५४४७, ४,५४५/- रू किं. त्यात बाटल्या सीलबंद करण्याचे प्लास्टीक बुच वेगवेगळ्या कंपन्याचे, १५०/- रू किं. त्यात २ नरसाळे, ४ स्टीलचे कटर, २ चिकट टेप, १५ रिकाम्या काचेच्या बाटल्या, विविध विदेशी दारूच्या कंपनीचे लेबल,

दारू

५००/- रू किं.५ लिटर रसायन असा एकुण ११,७२,१३०/- रूपये किंमतीचा बनावट विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने फरार आरोपीचा कारवाई दरम्यान शोध घेतला असता ते मिळून आले नाही. फरार व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

पोकॉ/२५६७ भगवान मधुकर सानप यांचे फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १२३, ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ब) (ड) (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

दारू
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारू
दारू
दारू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!