आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
व्हाईट बोर्ड

नेवासा | प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे सोमवार (दि. 3 ऑगस्ट 2026) रोजी विद्यालयाच्या 1998 च्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आणि पुणे येथील युनिफ्रॉक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या CSR निधीतून दोन अत्याधुनिक डिजिटल व्हाईट बोर्ड कार्यान्वित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यालयाच्या डिजिटल शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे.

व्हाईट बोर्ड

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रावसाहेब चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विलास नाबदे, सीए संदीप देशमुख, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षक सुनील धस, पर्यवेक्षक अरुण चौधरी, माजी शिक्षक अण्णासाहेब पवार तसेच 1998 च्या बॅचचे अनेक माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पर्यवेक्षक सुनील धस यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून तसेच डिजिटल व्हाईट बोर्डवर प्रत्यक्ष लेखन करून या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

व्हाईट बोर्ड

यावेळी मनोगत व्यक्त करताना सीए संदीप देशमुख आणि प्राचार्य विलास नाबदे यांनी, “ज्ञानोदय विद्यालयाने आमच्या जीवनाला दिशा दिली. आज आम्ही जे काही आहोत, त्यात या शाळेचा मोठा वाटा आहे. विद्यालयाचे ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, भविष्यातही शाळेच्या विकासासाठी आम्ही कायम सहकार्य करू,” अशी भावना व्यक्त केली.

माजी शिक्षक अण्णासाहेब पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी सांगितले की, ज्ञानोदय विद्यालयाने 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे.

व्हाईट बोर्ड
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

व्हाईट बोर्ड
व्हाईट बोर्ड
व्हाईट बोर्ड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

व्हाईट बोर्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!