नेवासा – नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल , कै. सौ.सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय त्याचप्रमाणे ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल ची ग्रंथ दिंडी आज शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात संपन्न झाली. या ग्रंथदिंडीची सुरुवात ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथून करण्यात आली . प्रारंभी विद्यालयात विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजवलेल्या रथामध्ये मांडण्यात आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व मराठी,हिंदी इंग्रजी साहित्यातील विविध ग्रंथांचे विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी, पर्यवेक्षक सुनील धस,

पर्यवेक्षक अरुण चौधरी, इंग्लिश मिडीयम च्या समन्वयक अर्चना कोरडे, कलाध्यापक कपिल चिंतामणी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर “ज्ञानोबा- तुकाराम” असा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताका, वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, डोक्यावर तुळस घेतलेल्या विद्यार्थिनी, श्रीविठ्ठल, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांच्या वेशभूषेतील बाल विद्यार्थी, गळ्यात टाळ घालून ज्ञानोबा माऊली तुकाराम या मंत्राचा जयघोष करत दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नेवासेकरांची मने जिंकली.

या ग्रंथदिंडीने नेवासा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शहरातील चौका चौकात शिक्षणप्रेमी पालकांनी या ग्रंथदिंडीचे आनंदाने स्वागत केले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पैसखांब मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने या ग्रंथदिंडीचे आनंदाने स्वागत करण्यात आले. सर्व बाल वारकरी व शिक्षकांनी ज्ञानेश्वरी रचनास्थानाचे दर्शन घेतल्यानंतर पसायदानाने ग्रंथ दिंडीची सांगता करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







