आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मतदार

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 12 विधान सभा मतदार संघ असून त्यापैकी कर्जत जामखेड, नगर शहर, श्रीरामपूर, शिर्डी, व कोपरगाव या 5 मतदारसंघाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित मतदार संघाचे देखील 98 टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याचे 100 टक्के काम पूर्ण होणार आहे.

मतदार


महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा व सुमारे 38 लक्ष पेक्षा अधिक मतदार असून ही जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांचे मार्गदर्शनखाली व त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळे काम मुदती पूर्वीच पूर्ण होत आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदार 3810102 असून त्यापैकी असंकलित मतदारांची संख्या 426113 इतकी आहे. यामध्ये 140766 इतके मतदार मयत असून 60841 मतदार दुबार असल्याचे आढळून आले आहे. तर उर्वरित सुमारे 2 लाखापेक्षा अधिक मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा त्यांचा शोध लागू शकलेला नाही.
असंकलित मतदारांचे एकूण मतदारांशी असलेले जिल्ह्यातील प्रमाण 11.18 टक्के इतके आहे. नगर शहरामध्ये ते सुमारे 22 टक्के आहे.

मतदार


मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदार यादीतील मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाचा तपशील अचूक दर्शविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेस मतदारांचे अचूक घर क्रमांक देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मतदारांचे घर क्रमांकाची अचूक माहिती स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी निर्देश दिले आहेत.
याशिवाय मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना किंवा नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करताना ज्या शाळेत असे मतदान केंद्र ठेवण्यात येईल त्या शाळांचे UDISE Code नमूद करण्याबाबत देखील मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाले असून त्यानुसार मतदान केंद्राची सुसूत्रीकरणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी दिली आहे.

मतदार


असंकलित मतदार यांची संख्या 426113 असून त्यामध्ये मयत ,दुबार कायम स्वरुपी स्थानांतरित , शोध न लागू शकलेले अशा मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांचेकडे अशा मतदारांच्या याद्या उपलब्ध असून त्या बाबत ची माहिती राजकीय पक्षाचे मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA) यांना देण्यात येत असून या याद्या संदर्भात त्यांचे सोबत बैठक घेण्याबाबत देखील स्थानिक BLO यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्राचे डिजिटिझेशन चे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर मयत , दुबार ,कायम स्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या स्थानिक स्तरावर ,तालुका पातळीवर व जिल्हा स्तरावरील website वर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मतदार


यासंदर्भात दावे हरकती दाखल करण्यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर ही सुधारित मुदत देण्यात आली असून 22 ऑक्टोबर पर्यंत असे दावे व हरकती निकालात काढण्यासाठी मुदत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी पुढे सांगितले आहे.

मतदार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदार
मतदार
मतदार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!