आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
धीरज परदेशी

नेवासा फाटा : स्वर्गीय धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नेवासा फाटा येथे पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिव महाराणा प्रताप चौक येथे प्रिन्स दरबार मित्र मंडळ व सकल हिंदू समाजाच्या वतीने शोकसभा घेऊन धीरज परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

धीरज परदेशी

यावेळी बादल परदेशी यांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद देत साथ दिल्याबद्दल सर्व समाजबांधवांचे, तसेच हिंदू-मुस्लिम बांधवांचे आभार मानले. “या घटनेचा विरोध करताना कोणत्याही समाजाला लक्ष्य करणे हा आमचा उद्देश नाही. आमचा विरोध हिंसक व जिहादी प्रवृत्तीला आहे; कोणत्याही ठराविक समाजाला नाही. दोषी व्यक्ती कोणत्याही समाजातील असो, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

पत्रकार संभाजी पठाडे यांनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. अनिल महाराज भनगे यांनी घटनेबाबत तीव्र रोष व्यक्त करत धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

धीरज परदेशी

सुकाणू समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनीही तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून घटनेमागील संपूर्ण सत्य समोर आणावे, दोषी व सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावेळी बादल परदेशी, अनिल परदेशी, उत्तम विटकर,दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राजेंद्र लिंगाडे, सुकाणू समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, युवा नेते आकाश धनवटे, रावसाहेब घुमरे, रिपाइंचे नेते बबलू साळवे, अनिल महाराज भनगे, पत्रकार संभाजी पठाडे, राजेंद्र शिंदे, एकलव्य संघटनेचे नंदू बर्डे यांच्यासह विविध समाजबांधव उपस्थित होते.

धीरज परदेशी

शिव महाराणा प्रताप चौक येथे झालेल्या या शोकसभेत धीरज परदेशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. न्यायासाठीचा लढा कायदेशीर मार्गाने अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

धीरज परदेशी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धीरज परदेशी
धीरज परदेशी
धीरज परदेशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धीरज परदेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!