भाविकांना लाभला महाप्रसाद कामिका एकादशीला ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात साबुदाणा खिचडीचे वाटप; २५० कर्मचाऱ्यांनी बजावली सेवाधर्माची भूमिका

नेवासा : कामिका एकादशीच्या पावन पर्वावर श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने सुमारे तीन लाख भाविकांना साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवगडचे स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज आणि श्री ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे देविदास महाराज मस्के यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ झाला. धार्मिक श्रद्धेसोबतच अन्नदानातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले.पंचगंगा उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रभाकर काका शिंदे, विश्वस्त बाळासाहेब शिंदे आणि काकासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून गेल्या पंधरा वर्षांपासून ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणातअन्नदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून पंचगंगा उद्योग समूहाने साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप केले जाते.

दरवर्षी या अन्नदानाची व्याप्ती वाढत असून यंदा तब्बल तीन लाख भाविकांपर्यंत महाप्रसाद पोहोचला.आषाढी एकादशीनंतर श्रावणातील कामिका एकादशीला नेवासा येथील माऊलींच्या ‘पैस खांब’ दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होतात. मंदिर व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार यंदा किमान दहा लाख भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांच्या सेवेसाठी नेवासा शहर व पंचक्रोशीतील विविध संस्था, अन्नदाते आणि सेवाभावी मंडळींकडून पाणी, चहा, फळे तसेच विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.याच सेवायज्ञात पंचगंगा उद्योग समूहाने सकाळी आठपासून रात्री आठ वाजेपर्यंत अखंड अन्नदान केले.

सुमारे २५० कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी दिवसभर कार्यरत होते. यंदाच्या महाप्रसादाची जबाबदारी अहिल्यानगरचे प्रसिद्ध आचारी मूलचंद महाराज यांनी सांभाळली.मान्यवरांचाही सेवाकार्यात सहभागदिवसभर सुरू असलेल्या महाप्रसाद वाटप केंद्राला आमदार विठ्ठलराव लंघे, सौ. रत्नमालाताई लंघे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले तसेच नेवासा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी भेट देऊन भाविकांना प्रसाद वाटपात सहभाग घेतला.या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर गारुळे, पंचगंगा शुगरचे जनरल मॅनेजर संदीप मोटे आणि कारभारी उदागे सुरेश पवार प्रताप चिंधे, माऊली पेचे, सतीश कर्डिले, , पप्पू परदेशी, यांनी विशेष परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







