घोडेगाव–: तालुक्यात पावसाळ्याचे सुमारे ७० दिवस उलटूनही पावसाचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे चित्र आहे. घोडेगाव मंडलात आतापर्यंत सरासरीच्या १७९ टक्के, तर सोनई मंडलात १९७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सुमारे ९० टक्के भागात याच स्वरूपाची परिस्थिती असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये पावसाबाबत चिंता व्यक्त होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला दिसत असला, तरी संपूर्ण हंगामाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यात या कालावधीत साधारण ३०० ते ३५० टक्के पावसाची अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणाच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांच्या वाढीवर तसेच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घोडेगाव मंडलात १७९ टक्के आणि सोनई मंडलात १९७ टक्के सरासरी पाऊस झाला असला, तरी तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाचे सातत्य राहिलेले नाही. काही ठिकाणी जोरदार सरी झाल्या, तर अनेक भागात पावसाने दीर्घ उघडीप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही.

दरवर्षी संपूर्ण पावसाळ्यात तालुक्यात सरासरी ६००ते ७०० टक्के पाऊस होत असल्याचे सांगण्यात येते. त्या तुलनेत यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेली पावसाची नोंद पाहता आगामी काळात दमदार पावसाची आवश्यकता आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास पिकांना पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.
सध्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, पुढील काही दिवसांत पावसाने जोर धरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः तालुक्यातील ९० टक्के भागात पावसाची स्थिती समाधानकारक नसल्याने उर्वरित पावसाळ्यात दमदार आणि सर्वदूर पाऊस होणे गरजेचेआहे.

पावसाची एकूण आकडेवारी पाहता काही मंडलांमध्ये टक्केवारी समाधानकारक दिसत असली, तरी प्रत्यक्ष पावसाचे दिवस, पावसातील खंड आणि भौगोलिक विषमता यामुळे परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे केवळ टक्केवारीवर समाधान न मानता उर्वरित पावसाळ्यात सर्वदूर आणि नियमित पाऊस होणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट..
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी कमी असल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. त्या साठी त्वरित मुळा उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात यावे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी पिक विमा भरुन देखील त्याची नुकसानभरपाई पासून कित्येक शेतकरी वंचित राहिले आहे तो देखील मिळावा त्याबरोबर च यंदाही अत्यल्प पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असल्याने सरकारने या कडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
– पंकज लांभाते मा. विधानसभा संघटक, घोडेगाव.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







