आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नागपंचमी

नेवासा – तालुक्यातील नागापूर येथे एकमेव नागदेवतेचे तथा नागनाथाचे मंदिर आहे. आज दिनांक 17 आठ 2026 रोजी हजारो भाविकांनी नागनाथाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
नागापूर हे या परिसरातील प्राचीन गाव असून येथे नागदेवतेचे जुने मंदिर आहे.
गाईचे खूर !
सशाचे उर!
सात कढाई नागापूर!
अशी दगडावर कोरीव शिल्प आहे.

नागपंचमी

नागनाथ देवस्थान ट्रस्टने मंदिराचा उत्तम जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब काळे यांनी सांगितले की या गावाला खूप चांगली आख्यायिका आहे. नागदेवतांचे सुंदर शिल्प दगडावर कोरले असून त्याकाळी एक चांगली बारव बांधली होती तथापि तिला पाणी नसल्यामुळे आता तिचा उपयोग होत नाही. सर्पदंशानंतर मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केल्यास नागनाथ देव प्रसन्न होतो. नागनाथ प्रतिष्ठानच्या वतीने व निवृत्ती काळे यांच्या प्रयत्नाने मंदिराला चांगले स्वरूप आले असून भव्य सभा मंडप व शेजारी उत्तम पटांगण सुशोभित केले आहे.

नागपंचमी


थोर क्रांतिकारक कॉम्रेड सोन्या बापू काळे यांच्या नेतृत्वाखाली या गावाला आमदार दत्ता देशमुख, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख दिनमित्रकार मुकुंदराव पाटील, संत कैकाडी बाबा यांनी समाज प्रबोधनासाठी भेटी दिल्या आहेत. आज दर्शनाचा लाभ घेण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे, माजी सभापती सौ सुनीता ताई गडाख, माजी आमदार मुरकुटे, ज्येष्ठ नेते काशिनाथ अण्णा नवले , खेडले काजळी सौ निर्मला ढगे एडवोकेट स्मिता लवांडे व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यानिमित्ताने भरलेल्या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या दुकानांनी मंदिर परिसर बहरलेला होता. पुरातत्व खात्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी भेट देऊन पुढील मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केली

नागपंचमी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नागपंचमी
नागपंचमी
नागपंचमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नागपंचमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!