नेवासा – पक्षाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि समाजकल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सुमित पटारे यांची नेवासा शहर काँग्रेस कमिटीच्या उपशहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष मा. अंजुम पटेल यांनी दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली.

सुमित पटारे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी तसेच समाजकल्याणाच्या उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभाग घेत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीपत्रात काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व विचारसरणी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

“समाजकल्याणाला प्राधान्य देत काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचविण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक आक्रमकपणे काम करणार,” असा निर्धार सुमित पटारे यांनी व्यक्त केला.
त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात नेवासा शहरातील संघटनात्मक बांधणीला त्यांच्या नियुक्तीमुळे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







