नेवासा- तालुक्यातील दिघी शिवारात पोपटराव पाठक यांच्या शेतावर हलक्या जमिनीत व कमी पाण्यामध्ये बाजरीचे अत्यंत बहारदार पिक आले आहे. तेलंगणा मधील धान्या सीड कंपनीने नवीन सहा जातीचे संकरित बियाणे प्रात्यक्षिक प्लॉट नजीक चिंचोली चे माजी सरपंच पोपटराव पाठक यांच्या शेतावर घेतले आहे. या पिकाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे , महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके व नजीक चिंचोली चे बियाणे तज्ञ अधिकारी सुभाष पाठक यांनी केली.

या बाजरीच्या जातीपासून धान्य उत्पादन सरासरी दहा क्विंटल एकरी मिळेल शिवाय या बाजरीच्या ताटाची उंची सरासरी आठ ते नऊ फूट असल्यामुळे चाराही भरपूर मिळेल विशेषतः या बाजरीच्या पिकाची वाढ उत्कृष्ट असून पानांची रुंदी चांगली असल्यामुळे चारा गुणवत्ता चांगली राहील. गोंडेगाव चौफुलीवर हा प्रयोग घेण्यात आला आहे जमीन मुरमाड व हलकी असली तरी तसेच अत्यंत कमी पाण्यावर बाजरी पिकाची वाढ जोमदार आहे.

एल निनो प्रतिकूल परिस्थितीत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर ढगे यांनी तुर व बाजरी पिके घ्यावीत असा सल्ला दिला होता. आज सर्वत्र पावसाचा मोठा खंड पडला आहे, मात्र बाजरी पिकावर त्याचा परिणाम दिसून आला नाही कारण पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती या नवीन संकरित वाणामध्ये आहे
कृषी अधिकारी श्री सुडके यांनी शेतकऱ्याची कौतुक करून उत्पादन चांगली मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
बियाणे तज्ञ अधिकारी सुभाष पाठक यांनी या परिसरात पुढील हंगामात नवीन जातीची बियाणे प्लॉट व त्याची पायलट योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. नजीक चिंचोली चे माजी सरपंच पोपटराव पाठक यांनी पीक पाहणी व प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







