नेवासा : नेवासा शहरातील दहीहंडी उत्सवाची सुरुवात यंदाही मारुती चौकातील जय हनुमान मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीने होणार आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मारुती चौक येथे या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेवासा शहरात दरवर्षी सर्वप्रथम मारुती चौकातील जय हनुमान मित्र मंडळाची दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली जाते. त्यामुळे या दहीहंडीला शहरातील पहिली आणि मानाची दहीहंडी म्हणून विशेष महत्त्व आहे.

यंदाच्या उत्सवासाठी जय हनुमान मित्र मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, कोल्हार येथील आकर्षक साऊंड सिस्टिम आणि भव्य लाइटिंग हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच संत-महंतांच्या उपस्थितीत हा उत्सव उत्साहात पार पडणार आहे.
उत्सवादरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रतापजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

या भव्य दहीहंडी उत्सवासाठी प्रायमस मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि न्यू साई मंगल ज्वेलर्स, नेवासा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
नेवासा शहरातील नागरिकांनी आणि गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







