आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पुस्तक

सुजन कट्ट्याच्या पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्यांचा ज्ञानोदय स्कूलमध्ये गौरव

नेवासा : जीवनाला सर्वांगीण समृद्धी आणि योग्य आधार देणाऱ्या पुस्तकांपासून विद्यार्थ्यांनी कधीही अंतर ठेवू नये. स्पर्धेच्या युगात मोबाईलचा अतिवापर बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी. पुस्तकांच्या सहवासातून विचारांची समृद्धी होऊन जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य शिरीष लांडगे यांनी केले.
नेवासा शहरात सुजन कट्टा या नावाने सुरू असलेल्या वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत आयोजित पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ज्ञानोदय स्कूलच्या कै. आशाबाई सुभाष अष्टेकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य लांडगे बोलत होते.

पुस्तक


यावेळी प्रमुख पाहुणे भास्करराव शिंदे, सुजन कट्टा उपक्रमाचे प्रवर्तक महेश मापारी, निलेश जोशी, डॉ. शंकरराव शिंदे, सतीश मुळे , कुणाल मांडण, सतीश पिंपळे आदी उपस्थित होते.
सुजन कट्टा उपक्रमाला मिळालेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील १६ शाळांमधून १२७ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तब्बल ९४ पुस्तकांचे रसग्रहण करून त्यांचा आशय, विचार आणि जीवनमूल्ये परीक्षकांसमोर प्रभावीपणे मांडली.
प्राचार्य लांडगे म्हणाले, “नवीन पिढीसमोर आज अनेक आकर्षणे आहेत. मात्र मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांशी दोस्ती केली तर विचारांची बैठक तयार होईल आणि जीवनाला योग्य वळण मिळेल.

पुस्तक

सुजन कट्ट्याच्या माध्यमातून तरुण पिढीला वाचनाची गोडी लावण्याचा सुरू असलेला प्रयत्न अनेक ठिकाणी अनुकरण करण्यासारखा आहे.”
प्रमुख पाहुणे भास्करराव शिंदे म्हणाले की, सृजन परिवारातर्फे निरपेक्ष भावनेने सुरू असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला दिशा देणारा आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून सृजन परिवाराचे सर्वांनी आभार मानले पाहिजेत.
स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. महाविद्यालयीन गटात गणेश अवताडे, वैभवी सलालकर, वैष्णवी जावळे व वैष्णवी जमदाडे यांनी यश मिळवले. शालेय गटात श्रावणी पिसाळ, ज्ञानेश्वरी खेडकर, पर्णवी परभणे, विनायक कोरेकर, ईश्वरी खटके, रोहन गायकवाड, अमित उपळकर व अनन्या धांडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

पुस्तक


स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या शाळांचे प्राचार्य रावसाहेब चौधरी, विश्वनाथ नाणेकर, वैभव आढाव, शैलेश दरेकर, सोपानराव काळे, अरुण चौधरी, साळवे सर व स्वाती वाघे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. किशोर धनवटे व डॉ. निर्मला सांगळे यांनी काम पाहिले. यावेळी सुधीर बोरकर, अभिजीत अष्टेकर, अमित मापारी, योगेश रासने, सौरभ मुनोत, रुपेश उपाध्ये , अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र चौधरी यांनी केले, तर महेश मापारी यांनी आभार मानले

पुस्तक
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुस्तक
पुस्तक
पुस्तक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुस्तक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!