आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रयत

नेवासा : रयत क्रांती संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील बाबुळवेढा येथील रहिवासी पंढरीनाथ हनुमंत कोतकर यांची, तर अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी संदीप रावसाहेब गवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंढरीनाथ कोतकर हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनात्मक चळवळींमध्ये सक्रियपणे कार्यरत असून, शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. तसेच संदीप गवारे यांनीही नेवासा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विविध सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांवर काम केले आहे.

रयत

शेतमजुरांचे प्रश्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तसेच इतर विविध प्रश्नांसाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आंदोलने आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
या संघटनात्मक कार्याची दखल घेत रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरीनाथ कोतकर आणि संदीप गवारे यांची अनुक्रमे अहिल्यानगर जिल्हा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा संपर्कप्रमुख या पदांवर नियुक्ती करण्यात आली.

रयत

संघटनेच्या नियम व धोरणांनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठा, सचोटी आणि समर्पणाने पार पाडावी, तसेच संघटनेच्या प्रतिमेची जपणूक करावी, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर नेवासा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील संघटनात्मक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

रयत
रयत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रयत
रयत
रयत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रयत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!