नेवासे – नेवासे तालुक्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण तालुक्याचे भूमिपुत्र आणि उत्तर नगर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाची आरती करण्याचा बहुमान मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या मंगलमय आरतीत नितीन दिनकर यांचा सहभाग हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून,संपूर्ण नेवासे तालुक्याच्या मातीचा सन्मान आहे.

मित्रपरिवारातून कौतुकाचा वर्षाव
ही आनंदाची वार्ता नेवासे तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच नितीन दिनकर यांच्या बालपणाचे मित्रपरिवार,कार्यकर्ते आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी,समाजासाठी झटणाऱ्या,तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणाऱ्या नितीन दिनकर यांच्या निस्वार्थ कार्याची हीच तर पावती आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
सामान्य कुटुंबातून येऊन,संघर्षाच्या जोरावर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत झेप घेणाऱ्या आणि आता थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आरतीचा मान मिळवणाऱ्या नितीन दिनकर यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

शुभेच्छांचा वर्षाव –
“नितीन यांच्या रूपाने नेवासे तालुक्याच्या मातीतील एक हिरा आज राज्याच्या राजधानीत चमकत आहे.त्यांच्या कार्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडत राहो,” अशा शुभेच्छा त्यांच्या असंख्य मित्र-मंडळींनी दिल्या आहेत नितीनभाऊ दिनकर यांच्या या सन्मानामुळे नेवासे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर अभिमानाने झळकत असल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या मित्र मंडळींतून व्यक्त केला जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







