आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

राजकीय घडामोडी – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी गडाख यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शंकरराव गडाख

नेवासा तालुक्यातील सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना, नेवासा तालुक्यात मात्र गडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

शंकरराव गडाख

शंकरराव गडाख यांना सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात सन २००७ मध्ये महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला गेला होता.

शंकरराव गडाख

दरम्यान, नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर गडाख यांचे असलेले राजकीय व सामाजिक वर्चस्व या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू झाली आहे.

एकमेव अर्ज दाखल झाल्याने गडाखांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात असली, तरी अंतिम निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!