नेवासा – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भालगाव येथील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका शितल झरेकर-आठरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यातर्फे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन २०२५-२६ साठी निवड झाली आहे.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने मानाची समजली जाणारी फेलोशिप शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने कृषी,साक्षरता, शिक्षण या विविध क्षेत्रात दरवर्षी जाहीर होते.यामध्ये २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाते. यासाठी सुमारे राज्यभरातून सुमारे ७३० अर्ज आले होते.या फेलोशिपची रक्कम साठ हजार,सन्मान पत्र,सन्मानचिन्ह असे स्वरूप असणार आहे.
ग्रामीण भागात असलेल्या भालगाव शाळेतील फेलोशिप विजेत्या शिक्षिका झरेकर यांनी शिकवत असलेल्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर आधारित “संगणन विचारातून भविष्यवेधी शिक्षणाकडे वाटचाल” या विषयावर प्रोजेक्ट सादर केला आहे. यापूर्वी शिक्षिका झरेकर यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ई बालभारती येथे व्हर्च्युअल पाठा द्वारे अध्यापन,शासनाच्या दीक्षा ॲप साठी व्हिडिओ निर्मिती,केंद्र शासनाच्या NCERT पोर्टल वर एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाद्वारे व्हिडीओ प्रसिद्ध ,कोरोना काळात एस सी इ आर टी च्या शिकू आनंदे उपक्रमामध्ये सुलभक,राज्य ,जिल्हा तज्न मार्गदर्शक काम करत राज्य नवोपक्रम स्पर्धेत यश व शासनाच्या जीवन शिक्षण मासिकात अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे.
यापूर्वी देखील जिल्हाधिकारी कार्यालय,रोटरी मिड टाउन अहिल्यानगर,पर्यावरण, सामाजिक व विविध सेवाभावी संस्थांनी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या यशाबद्दल जिल्हा परिषद चे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,विस्तार अधिकारी रुकसाना शेख,केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद, सरपंच दादासाहेब खरात,उपसरपंच बाळासाहेब आहेर,पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत,चेअरमन युवराज तनपुरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश तनपुरे, उपाध्यक्ष स्वाती खरात, पोपट खरात, मुख्याध्यापिका सरिता सावंत, सर्व सहकारी शिक्षक वृंद, सदस्य,ग्रामस्थ,पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.