नेवासा – देवगड परिसरात पूजनीय महंत भास्करगिरी महाराज यांच्या माध्यमातून संस्थान येथील गो – शाळा चालवत आहे. गो – संवर्धनामुळे या भागात भटक्या गायींची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे देवगड हे गाव देवभूमीसारखे आहे, असे प्रतिपादन विहिंप अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेशजी उपाध्याय यांनी केले.
गो- संरक्षणाबरोबर गोपालन, गो – संवर्धन करणे गरजेचे असल्याने प्रत्येक मंदिरे, देवस्थान ट्रस्ट, संस्थाने व ज्यांना शक्य आहे, त्या प्रत्येकाने घरासमोर गो – संवर्धन केल्याने गाई कत्तलखान्यांकडे जाणार नाही. त्यांच्या त्यांच्या संवर्धनामुळे त्यांचे आपोआप संरक्षणही होईल. असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सरकारने गो – मातेला राज्य माता दर्जा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून लवकरच गोमातेला विश्व माता दर्जा केंद्र शासनाकडून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. अशी माहिती विहिंप महाराष्ट्र – गोवा क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे यांनी दिली.
गोमातेचे शेण व गोमूत्र यांच्यापासून तयार होणारे गो अर्क वापरून सेंद्रिय शेती केल्यास भरघोस पीक व हमीभाव मिळतो. त्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याची माहिती विहिंप केंद्रीय कार्यकारणी सदस्य व पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरराव शिंदे यांनी दिली.
विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, उत्तर नगर जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे,निधी प्रमुख प्रशांत बहिरट विहिंप नेवासा अध्यक्ष डॉ. अविनाश काळे, जिल्हा पालक विश्वनाथ नानेकर,यश कदम गणेश मुरदाळे, बहिरट महाराज, दुर्गावाहिनी शक्ती साधना केंद्र प्रमुख पूजा लष्करे, नगर जिल्हा मंत्री अनिल जोशी, गोशाळा महासंघाचे सचिव गौतम कराळे आदी. पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.