गणेशवाडी – सोनई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सुरुवातीला पोलीस ठाण्याचे एपीआय विजय माळी व पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सोनई ग्रामपंचायतचे सदस्य जमशेद सय्यद, अंबादास राऊत, किशोर वैरागर, , भानुदास कुसळकर, संतोष साळवे सनी भाऊ साळवे, राजेंद्र दोंदे, रमेश पवार निळकंठ काकडे, उदय कर्डक आदी शाहू फुले आंबेडकर साठे यांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे कार्यकर्ते व सोनई येथील रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिन वैरागर राजू वैरागर शाबुद्दीन शेख उपस्थित जनसमुदायाला अल्पो उपहार व चहा पाण्याची व्यवस्था केली या प्रसंगी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजुभाऊ जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी, जालिंदर येळवंडे, प्राध्यापक रौंदळ सर राजेंद्र निंबाळकर युवानेते युवा नेते प्रकाश शेट संतोष तेलोरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याविषयी उपस्थित जनसमुदायाला आपल्या भाषणातून बाबासाहेबानी सर्व जाती धर्मांच्या नागरिकांसाठी केलेल्या कामाची व दिलेल्या अधिकाराची माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर वैरागर, आकाश काकडे, राहुल वैरागर, विशाल जगताप, सुनील पाडळे, जेकब साळवे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.