नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात इस्त्रो आणि विज्ञान भारती यांच्या विद्यमाने आयोजित ‘स्पेस ऑन व्हील’ या फिरत्या बस प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनात इस्त्रोद्वारा निर्मित विविध अंतराळ प्रक्षेपक, उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली. विज्ञान भारती संस्थेस थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे मार्गदर्शन होते तर सध्या डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर असे दिग्गज शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहेत. इस्त्रो आणि विज्ञान भारती यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या फिरत्या प्रदर्शनाचे नियोजन व आयोजन संपूर्ण भारतभर केले जात आहे. श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालये व सिनियर महाविद्यालयांना प्रदर्शन भेटीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
नेवासा महाविदयालयासह अठ्ठावीस संस्थेच्या ३५०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली. इस्त्रोच्या पहिल्या मानवी मोहिमेचे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा व त्यांना अवकाशात घेऊन जाणारे गगनयान पाहून अनेक विद्यार्थ्यांना तर जरा वेळ अंतराळातच होतो की काय अशी अनुभूती मिळाली. काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्हाला इस्त्रोच्या अंतराळ संशोधन संस्थेत जाऊन आल्यासारखा अनुभव आला, काहींना वैज्ञानिक प्रेरणा मिळाली तर काहींना या क्षेत्राची आवड व उत्सुकता निर्माण झाली असल्याचे सांगितले.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्याहस्ते झाले. डॉ. कल्हापुरे म्हणाले, नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरी या सर्वश्रेष्ठ ग्रंथातील अध्यात्म, तत्वज्ञान आणि विज्ञान या बाबी जगातील सर्व थोर शास्त्रज्ञ ते सर्वसामान्य समाज
यांनी स्विकारल्या. काही शास्त्रज्ञांनी ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचे संशोधन करून समाज विकासासाठीच्या अनेक बाबी उपलब्ध केल्या.
प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अरूण घनवट, उपप्राचार्य राधा मोटे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पुराणे, प्रदर्शन संयोजक प्रा. हरिश्चंद्र माने, प्रा. मयूर जामदार, प्रा. कविता जाधव, क्रीडा संचालक प्रा. सुनील गर्जे, प्रा. गोवर्धन रोडे, प्रा. भगवंत विरकर, प्रा. संदीप तोगे, प्रा. ज्योती भोगे, प्रा. सुकन्या आगळे, प्रा. प्रा. सुभाष सोनवणे,प्रा. रामभाऊ पवार, प्रा. सुजय नवले, प्रा. हरिश्चंद्र पंडित, प्रा. रवींद्र घोलप, प्रा. सूर्यकांत बर्डे, प्रा. सुरेश होले, प्रा. मुकुंद खर्डे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
उपक्रम आयोजनाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी महाविद्यालय सर्व सेवकांचे तसेच सहभागी शाळा-महाविद्यालायांचे अभिनंदन केले.
चौकट-तालुक्यातील सर्वच विद्यार्थी भविष्यात श्री ज्ञानेश्वर महाराजांचा विचार, आदर्श आणि सदिच्छा बरोबर घेऊन अंतराळ संशोधन क्षेत्रासह विविध क्षेत्रांत हे प्रदर्शन पाहून प्रेरीत होतील व यामुळे अंतराळ संशोधनासह त्यांच्या आवडीचे इतरही अभ्यास क्षेत्रात ते यशस्वी होतील. असे प्रदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल. ज्ञानेश्वर महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम राबवावे, असे आवाहन उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.