देवगड फाटा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्तजयंती महोत्सवानिमित्त भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासह विविध ठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे श्री देवगड क्षेत्र लखलखले असून या विद्युत रोषणाईने सर्व भाविकांना आकर्षित केले आहे. श्री देवगड श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली दत्त जयंती महोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण पार पडत आहे.रात्री होणाऱ्या किर्तनांना मोठी गर्दी होत आहे.
होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामुळे देवगडचा परिसर सद्या दत्तमय झालेला दिसत आहे.शनिवारी सायंकाळी ६ वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा श्री दत्त जन्मोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार असल्याने त्या दृष्टीने सोहळ्याची तयारी येथे सुरू असतांना दिसत आहे. देवगडचा होणारा दत्तजयंती उत्सव हा राज्यात आदर्शवत मानला जातो,देवगड परिसरातील स्वच्छता टापटीपपणा भाविकांना मोहिनी घालत आहे.
श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर तसेच महाप्रवेशद्वार,नुपूर,श्री पंचमुखी सिद्धेश्वर व कार्तिक स्वामी मंदिर तसेच देवगडच्या बाहेरील परिसरात भक्त निवासावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने ही विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षित करतांना दिसत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.