देवगड येथे श्री दत्त प्रभुंच्या व सदगुरू किसनगिरी बाबांच्या दर्शनाने नेहमीच आध्यात्मिक प्रचिती व उर्जा मिळते असे देवगड येथे दर्शनासाठी आल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी समाधान व्यक्त केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की गुरूवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने सदैव सामाजिक व राजकीय जीवनात कार्य करण्यास प्रेरणा मिळते” श्री दत्त जयंतीच्या पवित्र पर्वावर अहिल्यानगर जिल्ह्याचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र दत्त देवस्थान, देवगड येथे दत्तप्रभुचे सहकार्यांसोबत मनोभावे दर्शन घेतले आणि देवगड संस्थान प्रमुख राष्ट्रसंत वंदनीय गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज व वंदनिय गुरूवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे पुजन करत आशीर्वाद घेतले.
यावेळी त्यांच्या समवेत देवगड भक्त परिवारातील श्री राहुल ठोंबरे,वैभव वाघ,संतोष लांडे,मयुर राऊत,महेंद्र उपाध्ये,संतोष ढाकणे,राम वाघ व देवगड भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.