सोनई – बेलपिंपळगाव ता नेवासा येथील 52 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने गुरू दि 12 डिसेंबर 2024 रोजी झाली.
ये दशे चरित्र केले नारायणे
रांगता गोधने राखिताहे
हे सोंग सारिले या रुपे अनंते
पुढे ही बहु ते करणे आहे.
आहे तुका म्हणे धर्म संस्थांपणे
केला नारायणे अवतार
या अभंगाचे ह भ प उद्धव महाराज मंडलिक निरूपण केले.
बेलपिंपळगावचा यावर्षीचा अखंड हरिनाम सप्ताहाचे यावर्षीचे नियोजन श्री हनुमान विद्यालयातील 2005 च्या इयत्ता दहावीच्या बॅचने एकजुटीने केले असल्याचे ह भ प संजय महाराज सरोदे म्हणाले व तरुणांच्या अध्यात्मिक कार्याचे कौतुक केले. कीर्तन प्रसंगी ह भ प उद्धव महाराज मंडलिक म्हणाले बेलपिंपळगाव हे रोकडोबा हनुमंतरायाचं दिव्य स्थान आहे या दरबारामध्ये भरपूर असं अन्नदान अखंड या भूमीमध्ये घडते आहे. तसेच स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे गुरुवारी होणारा प्रसाद व शनिवारी रोकडोबा मंदिर येथे होणारा खिचडीचा प्रसाद यानिमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्रित येतात हे गाव परमार्थ करीत असताना सर्व हेवेदावे बाजूला ठेवून सर्व एकत्रित येऊन हे अनेक वर्षाची असलेली परंपरा अतिशय सर्व आनंदाने पार पाडत याचे विशेष कौतुक असल्याचे महाराज म्हणाले तसेच महाराष्ट्रामध्ये बेलपिंपळगाव हे अस गाव आहे या गावांमध्ये वर्षभर विविध माध्यमातून अखंड अन्नदान कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
परमार्थिक कार्याने गावाच्या प्रगतीत भर पडेल असाच धार्मिक कार्यातील एकोपा गावाने टिकून गावचे गावपण जपावे व गावात सुरू असलेले अन्नदान अखंड सुरूच रहावे अशी रोकडोबा चरणी प्रार्थना केली याप्रसंगी युवराज महाराज देशमुख ,केशव महाराज शिंदे ,सचिन महाराज पवार योगेश महाराज शेजुळ, कृष्णा महाराज पाचपुते ,अनिकेत महाराज शिंदे,विकास महाराज औटी, लक्ष्मण महाराज नांगरे यांचेसह वारकरी ,भाविक ,ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.