ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

परीक्षा

नेवासा – शालेय शुल्क न भरल्याचे कारण देत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी दिला आहे. सध्या शाळा महाविद्यालयांमध्ये राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२ वी परीक्षेसाठी अर्ज भरण्यात येत आहेत.

परीक्षा

नाशिक विभागातील स्वयंअर्थसहाय्यित शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत. शालेय शुल्क न भरल्याने शाळा व्यवस्थापनाकडून परीक्षा अर्ज भरले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शालेय शुल्काच्या नावाखाली जर विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येत असेल, तसेच विद्यार्थी व पालकांचे मानसिकं खच्चीकरण करण्यात येत असेल तर संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देसले यांनी दिला आहे.

परीक्षा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

परीक्षा
परीक्षा
परीक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

परीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!