नेवासा – शहरातील ज्येष्ठ समाजबांधव एकनाथराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व नेवासा तालुका अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, नेवासा शहर अध्यक्ष भास्करराव वाघमारे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नेवासा शहर समाज बांधवांची दर वाढ करण्यासंदर्भात बैठक नेवासा शहरातील संत सेनाजी महाराज मंदिर या ठिकाणी संपन्न झाली.
यापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी नाभिक समाजाने दरवाढ केली होती त्यानंतर तब्बल 5 वर्षांनी म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ करण्यात येत आहे सलून मटेरियल तसेच सर्वच क्षेत्रात वाढलेली महागाई लक्षात घेता नाभिक समाजाने 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी 40 रुपयांना असणारी दाढी आता 50 रुपयाला होणार आहे, पूर्वी 60 रुपयाला असणारी कटिंग आता 70 रुपयाला होणार आहे, कटिंग दाढीचे दर आता 120 रुपये असतील या प्रसंगी नेवासा शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.