ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बस

वडाळा बहिरोबा | प्रवीण तिरोडकर – सर्वात जुना थांबा असूनही एसटी बस गाड्या प्रवासी चढ उतार करण्यास नकार देत असल्याच्या निषेधार्थ वडाळा बहिरोबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाकडे एसटी प्रशासनाने पाठ फिरविल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

राज्य परिवहन मंडळ अस्तित्वात आल्यापासून वडाळा बहिरोबा येथे सर्व प्रकारच्या बस गाड्यांना थांबा असताना गेल्या काही वर्षांपासून चालक – वाहक मनमानीपणे प्रवासी चढ उतार करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार काँग्रेसच्या परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकांकडे करून नियमित पाठपुरावाही केला. मात्र तरीही बस गाड्या थांबत नसल्याने बुधवारी वडाळा – खरवंडी चौकात काँग्रेस, आम आदमी पार्टी, भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसहा ग्रामस्थ तसेच प्रवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले.

बस

यावेळी अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुतरफा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोलंबली होती. यावेळी ग्रामस्थ व प्रवाशांनी एसटीच्या मनमानी कारभाराविरोधात संतप्त आगपाखड केली. पूर्वसूचना देऊन सुमारे तासभर रास्ता रोको सुरु असताना एसटीचे जबादार अधिकारी आंदोलनाकडे फिरकलेच नसल्याने आंदोलकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेम्भेकर यांच्या विनंतीवरून रास्ता रोको मागे घेतला.

आंदोलनात काँग्रेसचे संदीप मोटे, शोभाताई पातारे, अंजुम पटेल, आम आदमी पार्टीचे प्रवीण तिरोडकर, भाजपचे सुनील पतंगे, यांच्यासह वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाबासाहेब मोटे, सचिन मोटे, लक्ष्मण मोटे, प्रतीक मोटे, दादासाहेब मोटे, वडाळा सोसायटीचे अशोक मोटे, माजी सैनिक आदिनाथ नजन, डॉ. नरवडे, अशोक गायकवाड, सुधाकर होंडे, गोरख कातोरे, बाजीराव वाघमारे, प्रेम गायकवाड, रंगनाथ झावरे, राजेंद्र चिंधे, संदीप वने, दीपक गायकवाड, जितेंद्र पतंगे, सारंगधर मोटे, संजय पवार, संजय कासवदे, दिलीप पवार, मुनाफ सय्यद आदिसह वडाळा, खरवंडी, म्हाळसपिंपळगाव ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बस


माजी आमदार देशमुखांचा संताप –
रास्ता रोको दरम्यान छत्रपती संभाजीनगरवरून अहिल्ह्यानगरच्या दिशेने प्रवास करणारे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे वाहन रास्ता रोकोत अडकले. यावेळी पायी आंदोलनस्थळी येत त्यांनी माहिती घेतली असता अत्यंत क्षुल्लक आणि रास्त मागणीसाठी ग्रामस्थ आणि प्रवाशांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर उतरावे लागल्याचे पाहून त्यांनी एसटी प्रशासनासह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त करत ग्रामस्थ तसेच प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली.


आता गुन्हे दाखल करण्यासाठी रास्ता रोको –
पूर्वसूचना देऊनही त्याची दखल घेण्यास तसेच आंदोलनस्थळी उपस्थित राहण्यासाठी बेजबाबदारपणे टाळाटाळ करणाऱ्या एसटी च्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी पोलीस प्रशासनाकडे केली असून या मागणीच्या पूर्ततेसाठी आगामी काळात रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

बस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बस
बस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!