ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रस्ता

नेवासा – महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या सुरू असलेल्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्यव्यापी प्रशासकीय न्यायालयीन लढा जनजागृतीरुपी जनआंदोलन उभारून प्रशासनाचे,राज्य सरकारचे लक्ष वेधत राज्यातील तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देत वेगवेगळी आंदोलने निदर्शने करत ग्रामीण भागातील गावागावातील वाडी वस्तीवरील शाळकरी विद्यार्थी,अपंग,शेतरस्ते पिडीत शेतकरी यांचा शेतरस्त्यांच्या कारणामुळे होणारा जीवघेणा प्रवास थांबावावा

रस्ता

यासाठी शासननिर्णयाची अंमलबजावणी व हायकोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावे तातडीने ग्रामशेरस्ता रस्ता समित्या स्थापन करून गावागावात निर्माण होणारे रस्त्याबाबतचे वाद गावपातळीवर समुपदेशन करून सामोपचाराने मिटवणे, शेतरस्त्यांच्या प्रकरणावरून होणारे वाद शेतकऱ्यांची बैठक घेऊन सोडवणे,वाद न मिटल्यास तहसीलदारांकडे प्रकरण सादर करणे,शेतकऱ्यांसाठी नवीन रस्त्याची मागणी असेल तर महसूल अधिनियम 1966 च्या कलम 103 अन्वये व १९०६ च्या ५/२ नुसार व कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे मागणी करणे समितीच्या बैठका घेऊन त्याचे अभिलेख तयार करणे असे असूनही या समित्या गठीत व कार्यरत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेती पडीक असणे शेतात बांधावरून शेतीपूरक औजारे, यंत्रसामुग्री घेवून जाण्यासाठी शेतात पिकलेला शेतमाल डोक्यावरून नेऊन शेती करणे,शेतमाल बाजारात घेवून जाता न येणे

रस्ता

यामुळे आर्थिक मानसिक त्रास सहन करत वाद, भांडणे,हाणामाऱ्या करणे, हायकोर्ट कचेऱ्या करणे हे प्रकार सर्रास होत आहेत यामुळे सततच्या तासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत यामुळे शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित व्हाव्यात ,वहिवाटेच्या रस्त्यांचे सर्वेक्षण होऊन त्याच्या नोंदी गाव नकाशावर याव्यात,तहसील कार्यालयातील शेतरस्ता प्रकरणे तातडीने निकाली काढावी नकाशावरील सर्व शेतरस्त्यांना नंबरी लावून नंबरी हटवणारांना दंड चालू करून नंबरींचे सर्वेक्षण सुरू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, सचिन शेळके,भाऊसाहेब वाळूंज, संजय साबळे यांनी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले असुन लवकरच जिल्हा, तालुका प्रशासणाला आयुक्तांकडून कार्यवाहीचे आदेश देण्याचे आश्वासन शिवपानंद शेतरस्ता चळवळीला देण्यात आले.अशी अशी माहिती चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांनी दिली

रस्ता
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!