गणेशवाडी – अवैधरित्या वाळु वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी करत कारवाई केली. दि. १८ रोजी घोडेगाव ते कुकाणा रोडवर चांदा येथे विशाल लहु सोनवणे वय. २८ रा.लांडेवाडी हा ४००० रुपये किंमतीची एक ब्रास वाळु एम एच १७ सि व्ही १२८० क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिक अप मध्ये गौनखनीज वाळुची विनापरवाना बेकायदा रितीने वाहतूक करताना चांदा येथे मिळुन आला.
सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत असलेले वाहन तसेच चार हजार रुपयांची वाळु असा एकुण सहा लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हे. काॅ. ज्ञानेश्वर शिंदे यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ४९८/२०२४ बिएनएस चे कलम ३०३(२) सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. दत्तात्रय गव्हाणे हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.