नेवासा तालुका लोकसेवक सरपंच संघटनेच्या उपाध्यक्ष व महिला आघाडी अध्यक्ष यापदाची नेवासा फाटा येथे झालेल्या बैठकीत निवड झाल्याचे संघटना अध्यक्ष सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले
नेवासा तालुक्यातील लोकसेवक सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी सौंदाळा सरपंच शरदराव आरगडे हे असुन आता संघटनेच्या उपाध्यक्षपदी कौठा गावचे सरपंच प्रमोद गजभार यांची निवड झाली असुन संघटनेच्या महिला अध्यक्षपदी हंडीनिमगावच्या सरपंच सौं पुजाताई भिवाजी आघाव यांची निवड करण्यात आली.
नेवासा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतवर मुदत संपल्याने प्रशासक आहे त्या ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यावर संघटनेच्या इतर पदांचा विस्तार करण्याचे यावेळी ठरले
ग्रामपंचायतच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी सरपंच संघटना पुढाकार घेत असते
तालुक्यातील अनेक प्रश्नावर सरपंच संघटनेने आंदोलन करून आवाज उठवलेला आहे यापुढे देखील तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना कृतिशील राहील असे याबैठकीत ठरले
यावेळी आदर्श संघटना मार्गदर्शक दिनकरराव गर्जे, मा सरपंच भाऊसाहेब सावंत, वर्षा नवले, ज्ञानेश्वर औताडे, रोहिणी निकम, हरिभाऊ थोरे, महादेव दराडे, नामदेव गायकवाड, दिलीप मते, महेश म्हस्के, कृष्णा शिंदे,सोपान लोखंडे, प्रकाश सोनटक्के, आदी सरपंच उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.